ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे मुख्यमंत्र्यांचा हेलिकॉप्टर अपघात टळला

अलिबाग, दि. ७ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे टळला आहे. हेलिकॉप्टरचा पंखा लागण्यापासून मुख्यमंत्री फडणवीस बचावले असून ते सुखरुप मुंबईला पोहोचले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (शुक्रवारी) अलिबागला एका नाट्यगृहाच्या उद्घाटनासाठी गेले होते. पण येथील वडखळजवळ जेएसडब्ल्यूच्या हेलिपॅडवर त्यांचे हेलिकॉप्टर उतरवण्यात आले होते. अलिबागमधील कार्यक्रम आटोपल्यानंतर ते पेनला आले, तेथून हेलिकॉप्टरने ते मुंबईला येणार होते.

मुख्यमंत्री फडणवीस हेलिकॉप्टरमध्ये चढण्यासाठी पुढे आले तोच अचानक हेलिकॉप्टर उड्डाण घेत असल्याचे सुरक्षारक्षकांच्या लक्षात आले. सतर्क असलेल्या सुरक्षारक्षकाने फडणवीस यांना लगेच बाजूला केले. सुरक्षारक्षकाच्या प्रसंगावधानतेमुळे मुख्यमंत्री फडणवीस हेलिकॉप्टरचा पंखा लागण्यापासून बचावले. मुख्यमंत्री फडणवीस सुखरुप आपल्या मुंबई येथील 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी पोहोचले आहेत. अपघाताच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुख्यमंत्री कार्यालयाने केले आहे. 

दरम्यान, मे महिन्यात लातूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. त्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोडक्यात बचावले होते.