ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शेतकऱ्यांच्या जमिनींसाठी त्यांची संमती घ्या - राजू शेट्टी

भोपाळ, दि. ८ (वृत्तसंस्था) - शेतकऱ्यांच्या जमिनींना मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी लाखाचे दर नव्हे तर त्यांची संमती घेतली जावी. शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या संमतीशिवाय घेऊ देणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टींनी दिला आहे. राजू शेट्टींचा किसान मुक्ती मोर्चा काल इंदूरमध्ये पोहोचला, त्यांनी त्यावेळी समृद्धी महामार्गासाठी जबरदस्तीने जमिनी हस्तांतरीत केल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

सरकारने नुकतेच समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनासाठी दर जाहीर केले आहेत. जीरायती जमिनीला सरासरी हेक्टरी ५० लाख रुपये दर मिळणार आहे. किमान ४० लाख रुपये ते ८५ लाख रुपये हेक्टरी भाव असेल, अशी माहिती जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी दिली आहे. हे दर एकरी असल्याचे अगोदर बोलले जात होते, पण एकरी नव्हे तर हेक्टरी म्हणजे अडीच एकरसाठी ५० लाख रुपये भाव देण्यात आला आहे.

समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनासाठी जरी सरकारने दर जाहीर केले असले, तरीही शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध सुरुच ठेवला आहे. त्यामुळे आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना लाखोंची भरपाई देण्याऐवजी त्यांची संमती घ्या, शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेऊ देणार नाही, वेळ आलीच तर आंदोलनही करु, असा इशाराच खासदार राजू शेट्टींनी दिला आहे.