ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

गोमांस तपासणीसाठी पोलिसांना मिळणार पोर्टेबल किट

मुंबई, दि. १० - राज्यातील पोलिसांना लवकरच गोमांस तपासणीसाठी पोर्टेबल किट दिलं जाणार आहे. ज्यामुळे गोमांसाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांना मदतच होणार आहे. न्यायवैदक विज्ञान प्रयोगशाळा अर्थातच फॉरेन्सिक लॅबने या किटची निर्मिती केली आहे.

फॉरेन्सिक लॅबनं तयार केलेल्या इलिसा या किटच्या माध्यमातून गोमांसाची तपासणी सहज शक्य होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे केवळ अर्ध्या तासात गोमांस आहे की नाही याचा रिपोर्ट देईल. महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा लागू झाल्यावरही मोठ्या प्रमाणावर मांसाची नेआण केली जाते. मात्र पोलिसांना ते गोमांस आहे की अन्य प्राण्यांचं मांस याची पडताळणी करण्यात अडचणी येतात. यासाठी म्हणून हे किट विकसीत करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात गोवंश बंदी कायद्यासोबतच महाराष्ट्र प्राणी सुरक्षा कायद्यातील तरतुदींनुसार बैलाची हत्या करण्यावरही राज्यात बंदी आहे. त्यामुळे बैलाचं मांस असल्याच त्याचीही माहिती या किटच्या माध्यमातून मिळणार आहे.