ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

आमदार नितेश राणे यांना अटक

सिंधूदुर्ग, दि. ११ - काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांना मालवण पोलिसांनी अटक केली आहे. सहाय्यक मत्स्य आयुक्तांविरोधात केलेल्या मासेफेक आंदोलनप्रकरणी मालवण पोलिसांनी ही कारवाई केली. नितेश राणे यांच्यासह २४ जणांना मालवण पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या सर्व जणांना थोड्याच वेळात कुडाळ सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे.

मच्छिमारांच्या विविध प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी गेलेले काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी सहाय्यक मत्स्य आयुक्तांवर थेट मासे फेकले होते. आमदार नितेश राणे यांनी मच्छिमारांच्या प्रश्नांबाबत जाब विचारण्यासाठी सहाय्यक मत्स्य आयुक्त जिल्हा कार्यालय मालवण इथं भेट दिली. यावेळी राणे त्यांच्यासोबत आलेल्या मच्छिमारांनी थेट आयुक्तांच्या टेबलवर माशांची टोपली ओतली.

यावेळी आयुक्तांसोबत चर्चा सुरु असताना, त्यांनी योग्य उत्तरं दिल्याने चिडलेल्या नितेश राणे यांनी थेट त्यांच्या अंगावर मासे फेकले. तुम्ही तुमची कामं नीट करत नाहीत, जनतेचे प्रश्न सोडवत नाहीत, पैसे खाता, त्यामुळेच आम्हाला इथं यावं लागतं, असं म्हणत नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना झापलं.