ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

भारनियमनमुक्त राज्यासाठी शेतकऱ्यांना वाढीव बिलं

लातूर, दि. १३ - राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांच्या वाढदिवसांचं निमित्त साधून महाराष्ट्र भारनियमन मुक्त करण्याचा प्रण राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता असताना केला होता. त्यानुसार शहरी भागातलं भारनियमन कमी झालंही. पण हे करता यावं यासाठी ३३ लाख शेतकऱ्यांच्या नावे वाढीव बिलं पाठवण्यात आल्याचं उघड झालं आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आजवर असा तब्बल  हजार कोटींचा फटका बसलाय. हे सगळं प्रकरण पाहून शेतकरी पुत्रांनी शेतकऱ्यांनाच कसं नागवंल याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.

दिवाकर उरणे लातूरच्या परिमंडळ कार्यालयात वाणिज्य शाखेचे ज्युनिअर मॅनेजर होते. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र भारनियमन मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यासाठी बैठका सुरु झाल्या.

किमान शहरी भागात लोडशेडिंग कमी करण्याचं ठरलं. त्यासाठी महावितरणचा तोटा कमी आहे, हे एमईआरसीला दाखवावं लागणार होतं. म्हणून एका रात्रीतून शहर पाणी पुरवठ्याची बिलं १४ कोटींनी आणि शहर दिवाबत्तीची बिलं ४० कोटींनी वाढवण्यात आली.

पाणी पुरवठा आणि दिवाबत्तीचा लोड वाढवून भागेना, तेव्हा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा गळा कापण्याचा निर्णय घेतला. एचपीचे शेतीपंप वापरणाऱ्या लाख ५४ हजार ६३७ शेतकऱ्यांना एचपीची वाढीव बिलं देण्यात आली. एचपीवाल्या लाख ३८ हजार ४७३ शेतकऱ्यांना . एचपीची बिले देण्यात आली. ७.५ एचपी पंपवाल्या १२ हजार ६०४ शेतकऱ्यांना १० एचपीची वाढीव बिलं देण्यात आली. महाराष्ट्रात एकूण लाख हजार ७२४ शेतकऱ्यांची बिलं वाढवण्यात आली. वाढीव बिलांमुळे शेतकऱ्यांच्या नावांवर प्रत्येक तीन महिन्याला ८० कोटींचा बोजा चढत गेला.

महावितरण खात्यातून रिटायर झाल्यावर दिवाकर उरणेंनी आत्मसन्मानासाठी लढाच उभारला. महावितरणच्या प्रकाशगड या मुख्यालयावर माहितीच्या अधिकाराचा पाऊस पाडला आणि धक्कादायक खुलासे होऊ लागले. ‘प्रकाशगडने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना खोटी बिलं दिली गेल्याचं माहिती अधिकारात मान्य केलं.

मधल्या काळात उरणेंनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक आणि स्वतःवरचा अन्याय सांगितला. २० फेब्रवारी २०१७ रोजी खंडपीठात महावितरणे वाढलेल्या बिलांच्या प्रकरणांची चौकशी सुरु असल्याचं मान्य करुन मुदत देण्याची विनंती केली. पण आजतागायत महाराष्ट्रातल्या सुमारे ३५ लाख शेतकऱ्यांच्या माथी वाढीव बिलं मारण्यात येत आहेत.सध्या महावितरण शेतकऱ्यांच्या नावे १२ हजार कोटींची थकबाकी दाखवत आहे. जिथे तिथे <