ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

हेल्‍मेटसक्‍तीला तूर्तास स्‍थगिती - विश्वास नांगरे-पाटील

कोल्हापूर, दि. १३ - कोल्‍हापूरसह 5 जिल्‍ह्यातील हेल्‍मेटसक्‍तीला तूर्तास स्‍थगिती देण्‍यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, सातारा या जिल्ह्यात हेल्मेट सक्तीचे आदेश दिले होते. मात्र गुरुवारी झालेल्‍या सर्वपक्षीय नेत्‍यांसोबतच्‍या बैठकीनंतर या आदेशास स्‍थगिती देण्‍यात आली आहे, अशी माहिती विश्‍वास नांगरे पाटील यांनी कोल्‍हापुरात दिली.

15 जुलैपासून कोल्हापूरसह सातारा, सांगली, पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीणमध्ये शहाराअंतर्गत हेल्मेटसक्तीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्याला सर्वपक्षीयांनी विरोध केला होता. त्याबाबत आज सर्वपक्षीयांनी विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेऊन, चर्चा केली. वाहनचालकांचं हेल्मेट वापरण्याबाबत जास्तीत जास्त प्रबोधन करून, हळूहळू सक्ती करण्याचं या बैठकीत ठरलं.