ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

देशभरातील महिला खासदारांची भायखळा जेल भेट

मुंबई, दि. १३ - मुंबईतील भायखळा जेलमध्ये झालेल्या मंजुळा शेट्येहत्याप्रकरणाची दखल महिला आयोगानंतर आता महिला खासदारांनीही घेतली. देशभरातील सुमारे ३० महिला खासदारांनी आज भायखळा महिला कारागृहाला भेट दिली. महिला कैद्यांचे प्रश्न आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर ही भेट होत आहे. आसामच्या खासदार बिजॉय चक्रवर्ती यांच्या नेतृत्त्वात महिला खासदारांचं पथक आज सकाळी भायखळा जेलमध्ये दाखल झालं.

जेलला भेट देणाऱ्या खासदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, भाजप खासदार रक्षा खडसे, एम के कनीमोळी यांचा समावेश आहे. मंजुळा शेट्येचा जेलर मनीषा पोखरकर आणि महिला कॉन्स्टेबल बिंदू नाईकडे, वसीमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे, आरती शिंगणे यांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. याप्रकरणी सर्व आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटकही करण्यात आली आहे.

भायखळा जेलमधील मंजुळे शेट्ये  या महिलेचा शनिवार (२४ जून २०१७) मृत्यू झाला होताअधिकाऱ्याच्या मारहाणीनंतर मंजुळे शेट्येचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. महिला कैद्याच्या हत्येपूर्वी तिच्यावर सहा महिला अधिकाऱ्यांकडून लैगिंक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंजुळा शेट्ये हिच्याकडून दोन अंडी पाच पावांचा हिशेब लागत नसल्याचे निमित्त करून तिला मारहाण करण्यात आली. एका बॅरेकमध्ये मंजुळाला नग्न करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली तसेच तिचा लैंगिक छळही करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या प्रकारानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी धीर देत महिला कैद्यांना बोलतं केलं. तेव्हा इतर महिला कैद्यांनी घडल्या प्रकाराची माहिती त्यांना दिली. त्यानंतर एका महिला कैद्याच्या तक्रारीवरुन नागपाडा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

तक्रारीत कैदी महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. आता पोलीस त्या अनुषंगाने तपास करीत आहेतदरम्यान, या प्रकरणातील साक्षीदारांना तपास पूर्ण होईपर्यंत अन्य कारागृहात हलवण्यात यावे अशी मागणी शेट्ये कुटुंबीयांनी केली आहे.