ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

कोपर्डी सारख्या घटना घडू नये यासाठी उपाययोजना गरजेची – आ. गो-हे

अहमदनगर, दि. १४ - कोपर्डी गावात एका निष्पाप अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेला काल (दि. १३) एक वर्ष पूर्ण झाले. कोपर्डीसारख्या घटनेची पुनरावृत्ती समाजात होऊ नये यासाठी काही ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. न्यायालयाने या घटनेतील आरोपींना शिक्षा दिली आहे, ही शिक्षा केवळ तात्पुरती मलमपट्टी आहे. अत्याचार करण्याची मानसिकता समाजातून मुळासकट घालवणे गरजेचे असल्याचे मत विशेष हक्क समितीच्या अध्यक्षा आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी व्यक्त केले.

शासन पातळीवर काही योजनांची सुरुवात करणे गरजेचे आहे. त्यामध्ये अत्याचार पिडीताना संरक्षण मदत योजना. या योजनेमध्ये अत्याचारित महिला युवतींना आवश्यक ती वैद्यकीय मदत वेळेत मिळावी, याबाबत राज्य सरकारकडून लवकरात लवकर कार्यवाही व्हावी. तसेच राज्य शासनाच्या मनोधैर्य योजनेत अजून काही बदल होणे अपेक्षित आहे. ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांत तरुण मुली/महिलांची छेडछाड रोखण्यासाठी आवश्यक त्या ठोस उपाय योजना व्हाव्यात.

खुनाच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले असून या विद्यार्थिनीला श्रद्धांजली अर्पण करताना गो-हे बोलत होत्याडॉ. नीलम गो-हे म्हणाल्या, कोपर्डी खटल्यातील आरोपींना न्यायालयाने योग्य ती शिक्षा सुनावली आहे. मात्र केवळ या तात्पुरत्या मलमपट्टीने या जखमा भरणार नाहीत. सरकारने दिलेले आर्थिक मदतीचे आश्वासन सरकारने पूर्ण केले असल्याचे कोपर्डी अत्याचार पीडित मुलीच्या पालकांनी सांगितले आहे. परंतु आर्थिक मदतीसोबत धोरणात्मक पातळीवर अजूनही काही आवश्यक ते बदल होण्याची आवश्यकता या निमित्ताने जाणवत आहे.

ग्रामरक्षक दलांच्या संकल्पनेला अजूनही मूर्त रूप आलेले नाही. याची अंमलबजावणी अधिक वेगाने सुरु व्हावी, त्यात बदल होण्यासाठी सामाजिक राजकीय इच्छाशक्तीची गरज असून सर्व पक्षीयांनी याबाबत योग्य ती कारवाई करावी. कायदे विषयक अंमलबजावणी अचूक निर्दोष करण्यासोबतच समाजात अशा घटना घडू नये यासाठी स्त्री पुरुष समानतेचा विचार त्या विषयक प्रबोधन वैयक्तिक सार्वजनिक जीवनात स्वीकारायला हवे. दूरवर असलेल्या गावांमध्ये पोलीस