ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

इंदू सरकार विरोधाला तुमचा पाठींबा आहे का – राहुल गांधी

मुंबई, दि. १७ - आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर साकारलेल्याइंदू सरकारया चित्रपटाला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या विरोधाला तुमचाही पाठींबा आहे का? मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असावे हे तुम्हाला मान्य आहे का; असा सवाल चित्रपटाचे दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी काँग्रेस उपाध्यक्ष आणि दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नातू राहुल गांधी यांना ट्विटरद्वारे केला आहे.

इंदू सरकार या आणिबाणीवर आधारीत चित्रपटाच्या प्रदर्शनाला काँग्रेस कार्यकर्त्यांचा विरोध आहे. प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट काँग्रेस नेत्यांना दाखविण्यात यावा; अशी मागणी काँग्रेसने केली होती. मात्र भांडारकर यांनी आक्रमक भूमिका घेत आपण कोणालाही हा चित्रपट प्रदर्शनापूर्वी दाखविण्यास बांधील नाही; असे प्रत्युत्तर दिले.

त्यांच्या या भूमिकेने संतप्त भूमिकेवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी या चित्रपटाच्या प्रमोशनल विरोध करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पुण्यातील पत्रकार परिषद रद्द करणे भांडारकर यांना भाग पडले. त्याचीच पुनरावृत्ती नागपूरमध्येही झाली. त्यामुळे सिनेमाचं प्रमोशन करताच मधुर भांडारकर माघारी परतले.

इंदू सरकारया चित्रपटाचाट्रेलरप्रसिद्ध झाला असून या चित्रपटात काँग्रेसची बदनामी करण्यात आली आहे. काँग्रेसला बदनाम करण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने हा चित्रपट प्रायोजित केला आहे; असा काँग्रेसचा आरोप आहे. काँग्रेसच्या राहुल ब्रिगेडचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनीही या चित्रपटाबाबत संताप व्यक्त केला आहे. हा चित्रपट म्हणजे इंदिरा गांधी आणि काँग्रेसला बदनाम करण्याचा कट आहे; असा आरोप त्यांनी केला आहे. हा कट कोणाच्या कृपेने रचण्यात आला आहे; याची माहितीही आपल्याकडे आहे; असेही ते म्हणाले.

मात्र आणीबाणीच्या काळातील परिस्थितीची माहिती नव्या पिढीला मिळावी; अशा उद्देशातून हा चित्रपट केल्याचे भांडारकर यांचे म्हणणे आहे. अभिनेते अनुपम खेर, नील नितीन मुकेश यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका रंगविल्या आहेत. हा चित्रपट २८ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.