ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

आयएएस मिलिंद म्हैसकर यांच्या मुलाची आत्महत्या

मुंबई, दि. १८ - आयएएस अधिकारी मनिषा आणि मिलिंद म्हैसकर यांच्या मुलाने आत्महत्या केली आहे. मन्मथ म्हैसकर (वय २२) याने सकाळी सात वाजता आत्महत्या केली. मुंबईतील मलबार हिल परिसरातील नेपियन सी रोडवरील दरिया महल इमारतीवरुन उडी घेऊन त्याने जीवन संपवलं.

मिलिंद आणि मनिषा म्हैसकर दोघेही आयएस अधिकारी आहेत. त्यांना मन्मथ हा एकुलता एक मुलगा होता. मिलिंद म्हैसकर हे म्हाडाचे उपाध्यक्ष आणि सीईओ आहेत. तर मनीषा म्हैसकर या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव आहेत.मन्मथ हा शिक्षण घेत होता. आज सकाळी मित्राला भेटायला जातोय, असं सांगून घराबाहेर गेला. मात्र त्याने थेट इमारतीवर जाऊन खाली उडी घेऊन जीव दिला. मन्मथने आयुष्य का संपवलं याबाबतची चौकशी सध्या सुरु आहे.