ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

दरमहा अनुदानित सिलिंडरची किंमत वाढणार, अनुदान बंद होणार

मुंबई, दि. १ - स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरवर दिले जाणारे अनुदान टप्याटप्याने बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून अनुदान शून्यावर येईपर्यंत सिलेंडरच्या किमती दरमहा चार रुपयांनी वाढवण्याचा आदेश पेट्रोलियम कंपन्यांना दिला आहे. असे करून मार्च २०१८ पर्यंत घरगुती गॅस सिलिंडरवर मिळणारे अनुदान संपवण्याचा सरकारचा उद्देश आहे.

पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी लोकसभेत माहिती देताना सांगितले की, मागील वर्षी ऑइल कंपन्यांना अनुदानित सिलिंडर्स (१४.)च्या किमती दर महिन्याला दोन रुपयांनी वाढवण्याचा आदेश दिला होता. परंतु आता ही मासिक दरवाढ दुप्पट म्हणजे चार रुपयांनी करण्यात आली आहे. पुढच्या वर्षीच्या मार्चपर्यंत सिलिंडरची किंमत ३२ रुपयांनी वाढेल

सध्या प्रत्येक कनेक्शनवर वर्षभरात १२ सिलिंडर सबसिडी असलेल्या किमतीत मिळतात. यानंतर ग्राहकांना बाजारभावानुसार सिलिंडर खरेदी करावा लागतो.