ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पुण्याला लवकरच मिळणार आरोग्य प्रमुख, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई, दि. २ - पुणे महापालिकेतील मुख्य आरोग्य अधिकारी यांचे पद लवकरच भरण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिले. तसेच, पालिकेच्या सोनोग्राफी मशिन खरेदीतील गैरव्यवहारांची चौकशी करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली.

पुणे शहरातील आमदार विजय काळे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. औषध खरेदी; तसेच सोनोग्राफी मशिनच्या खरेदीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे माजी प्रमुख एस. टी. परदेशी हे  ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले असून गेल्या महिन्यापासून आरोग्य प्रमुख पद रिक्त आहे.

आरोग्य खात्यातील अनेक पदे रिक्त असल्याने नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांवर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे यावर कार्यवाही करण्याची मागणी विजय काळे यांनी केली. त्यावरही खुलासा करताना, आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याच्या सूचना पालिकेला करण्यात आल्या आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.