ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पानसरेंच्या मारेकऱ्यांना पकडून देणाऱ्याला १० लाखांचे इनाम

कोल्हापूर, दि. २ - कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणातील संशयित आरोपी सारंग दिलीप अकोलकर आणि विनय बाबूराव पवार यांना पकडण्यासाठी १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करावे, असा प्रस्ताव तपास यंत्रणेने राज्य शासनाला पाठवला होता. या प्रस्तावाला गृहविभागाने मंजूरी दिली असून, गृहविभागाने बुधवारी फरारी आरोपी विनय पवार आणि सारंग अकोलकर यांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस देण्याचा प्रस्ताव पारित केला. संशयित आरोपी सारंग दिलीप अकोलकर हा पुण्याचा असून, विनय पवार हा कराडजवळील उंब्रजचा रहिवासी आहे.

पानसरे हत्येप्रकरणी यापूर्वी समीर गायकवाड आणि सनातन संस्थेचा साधक डॉ. वीरेंद्र तावडे यांना अटक झाली होती. राज्य सरकारने पानसरे हत्या प्रकरणी संशयित विनय पवार आणि सारंग अकोलकर यांची माहिती देणाऱ्यास १० लाखांचे बक्षीस जाहीर केले असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.

फेब्रुवारी २०१५ मध्ये पानसरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. सनातन संस्थेचे साधक समीर गायकवाड आणि वीरेंद्र तावडे यांच्यासह विनय पवार आणि सारंग अकोलकर यांच्यावर या प्रकरणी विशेष तपास यंत्रणेने दोषारोप दाखल केले आहेत. दाभोलकर हत्या प्रकरणात यापैकी वीरेंद्र तावडे न्यायालयीन कोठडीत आहे, तर समीर गायकवाडला नुकताच जमीन मंजूर झाला आहे. विनय पवार आणि सारंग अकोलकर यांच्याबाबत कोल्हापूर सत्र न्यायालयाने गेल्या महिन्यात अटक वारंट जारी करूनही ते सापडले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर अखेर बक्षीस जाहीर करण्यात आले.