ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

दारुच्या नशेत केलेली स्टंटबाजी जीवावर बेतली

सिंधुदुर्ग, दि. ३ - काही अतिउत्साही पर्यटकांच्या पावसाळ्यात दुर्दैवी मॄत्यूंच्या घटना घडल्याच्या बातम्या काही दिवसांपासून सतत ऎकायला मिळत आहेत. त्यात सेल्फीच्या नादात, दारूच्या नशेत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या अधिक असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अशातच आता पुन्हा एकदा दारूच्या नशेत दोन पर्यटकांचा आंबोलीतील दरीत पडून मॄत्यू झाल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघड झाला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली कावळेसादमध्ये सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार घडला. इम्रान गारदी आणि प्रताप राठोड अशी दरीत कोसळलेल्या तरूणांची नावे असून हे दोघे जण दारु प्यायल्यानंतर डोंगराच्या कड्यावर स्टंटबाजी करत होते. हीच स्टंटबाजी त्यांच्या जीवावर बेतली आहे.

दारूच्या नशेत डोंगराच्या कडेला असलेला संरक्षक कठडा ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना काही लोकांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण दारूची नशी ऐवढी होती त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. आधी एकाचा पाय घसरला आणि त्याच्यासोबतच दुसराही घरंगळत दरीत कोसळला. दरीतून दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरीत कोसळलेल्या दोघांपैकी एक जण बीडचा तर दुसरा गडचिरोलीचा रहिवासी असल्याची माहिती आहे.