ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाचे नेतृत्व करणार छत्रपतींचे वंशज

नाशिक, दि. ३ - येत्या ऑगस्टला राज्यभरात गाजलेला मराठा क्रांती मोर्चा मुंबईत धडकणार असून राज्य समन्वय समितीची स्थापना या मोर्चासाठी करण्यात आली आहे. २१० सदस्य या समितीत असणार आहेत. संभाजी राजे आणि उदयनराजे या समितीमध्ये मुख्य मार्गदर्शक राहणार असल्यामुळे हा मोर्चा आता कितपत यशस्वी ठरतो आणि यावर सरकार काय भूमिका घेते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

संपूर्ण राज्यभरात कोपर्डी बलात्कार खून प्रकरणानंतर विविध मागण्यांसाठी मराठ्यांचा मूकमोर्चा निघाला. या सर्वच मोर्चांना राज्यभरातून जोरदार प्रतिसाद मिळाला. लाखोंच्या संख्येने मराठा समाजातील लोक एकत्र आले. हा मोर्चा आता मुंबईत धडकणार आहे. ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाचे नियोजन करण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन्ही वंशज संभाजी राजे उदयनराजे भोसले यांचा या समितीमध्ये समावेश असून हा मराठा मोर्चा त्यांच्याच नेतृत्वाखाली करण्यात येण्याचे समितीने ठरवले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील निवडक सदस्यांचा यात समावेश करण्यात आला असल्याची माहिती समन्वय समितीचे संयोजक करण गायकर यांनी सांगितले.