ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

६ ऑगस्टपासून संपावर जाणार बेस्ट कर्मचारी

मुंबई, दि. ४ - बेस्ट कर्मचाऱ्यांनी येत्या ऑगस्टपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा संप बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भातील मागण्यांसाठी पुकारण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेले उपोषण काल गुरुवारी मागे घेण्यात आले, पण त्याऐवजी संपाचा इशारा बेस्ट कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

गेल्या चार दिवसांपासून वेतनासंदर्भातील मागण्यांसाठी बेस्ट संयुक्त कामगार कृति समितीचे उपोषण सुरु होते. काल दुपारी झालेल्या सभेत कामगारांच्या इच्छेप्रमाणे उपोषण मागे घेत संपाची हाक देण्यात आली. आपल्या वेतनविषयक मागण्या ऑगस्टपर्यंत मान्य झाल्यास त्याच रात्रीपासून बेस्ट बंद करुन संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला.

बेस्टच्या कर्मचाऱ्यांना गेल्या काही महिन्यांपासून वेळेत पगार दिला जात नाही. त्यामुळे मे महिन्याच्या थकलेल्या पगारापैकी अर्धा पगार १९ जूनला बेस्ट कर्मचाऱ्यांना देण्यात आला. यानंतर उर्वरित पगारासाठी बेस्ट कर्मचारी संघटनांनी २२ जूनला संपावर जाणार होते.