ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

उच्च न्यायालयाचे सरकारला खड्ड्यावरुन खडेबोल

मुंबई, दि. ४ - मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला राज्यातील आणि मुंबईतील रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण वाढल्यामुळे अपघातही वाढले. आणखी किती बळी गेल्यावर रस्त्यांची अवस्था सुधारेल ? असा सवाल केला आहे.

मुंबईसह राज्यातील रस्त्यांवर पावसाळ्याच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. अनेक ठिकाणी तर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आज मुंबई आणि राज्यभरातील खड्ड्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करताना प्रशासनाला हा संतप्त सवाल केला. एखाद्या समितीचा अहवाल अभ्यासण्यासाठी दुसऱ्या सुपर समितीची नेमणूक करावी लागणे हे लज्जास्पद आहे, असेही न्यायालयाने म्हटले. खड्डेमूक्त रस्ते देणे हे सरकारचे काम आहे. पण ते होताना दिसत नाही, असेही न्यायालयाने सुनावले. मुंबईसह राज्यभर खड्ड्यांची परिस्थिती सारखीच असल्याचा शेराही न्यायालयाने मारला.