ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

बाळासाहेब श्रद्धास्थान तर पवार, देशमुख आदरस्थान – डॉ. नीलम गो-हे

मुंबई, दि. ५ - महाराष्ट्राच्या राजकारणातील एक आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून शरद पवार यांच्याकडे पहिले जाते. राजकारणातील सुसंस्कृत, व्यवहारी आणि नेमकेपणाने बोलणारे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. तर सांगोला मतदार संघातून सलग ११ वेळा निवडून येणारे गणपतराव देशमुख एकमेव आमदार आहेत. त्यामुळे स्व. बाळासाहेब ठाकरे आमचे श्रद्धास्थान आहेत तर शरद पवार गणपतराव देशमुख आमच्यासाठी आदरस्थान आहेत. असे गौरवोद्गार शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी विधान परिषदेत काढले.

शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव काल विधिमंडळात मांडण्यात आला. त्यावेळी आमदार डॉ. गो-हे बोलत होत्या. पवारांनी राजकारणापलीकडे जाऊन स्नेहाचा धागा अबाधित ठेवला. शिवसेनेशी त्यांचे राजकीय मतभेद असले तरी शिवसैनिकांशी त्यांचे मनभेद कधीच नाहीत. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या स्नेहातून महाराष्ट्राच्या राजकारणात निराळेच समीकरण तयार झाले.

डॉ. गो-हे पुढे म्हणाल्या की, शरद पवार यांच्या पन्नास वर्षांच्या राजकीय कारकिर्दीतील २५ वर्षे काँग्रेससोबत तर उर्वरित २५ वर्षे काँग्रेसशिवाय व्यतीत झालेली आहेत. मे १९९९ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निर्मितीच्या आठ दिवस आधीच स्व. बाळासाहेब ठाकरेंनी शरद पवार आता वेगळा पक्ष काढणार अशी भविष्यवाणी दै. सामनामधून केली होती त्यानंतर लगेचच जून १९९९ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा उदय झाला. त्यांचे शिवसेनेसोबत वैचारिक मतभेद असले तरी त्यांनी शिवसेनेला राजकारणात साथ देण्यासाठी केलेली सल्ला मसलत महत्वाची होती. मात्र आमच्याकडचे काही लोक त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेले त्यांना डोळे पुसायला रुमालही साहेबांनी दिले, असा मिश्कील चिमटाही आमदार डॉ. गो-हे यांनी यावेळी काढला.

शरद पवार यांच्याबाबत बाळासाहेब ठाकरे अगदी काही शेलक्या शब्दात बोलत असत, मात्र त्यांनी आपल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना कधीही त्यांची भाषा वापरण्याची परवानगी दिली नाही. किंबहुना, माझ्यात आणि तुमच्यात फरक आहे. जे मी बोलतो ते माझे आहे, तुम्ही तुमचे वेगळे बोला, असा सज्जड दमही त्यांनी कार्यकर्त्यांना एकदा वेगळी