ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

उंचीवर बंदी नाही, १४ वर्षांहून लहान मुलांना थरावर चढण्यास मनाई

मुंबई, दि. ८ - मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी दिलेल्या निर्णयामध्ये दहीहंडीच्या उंचीवरील मर्यादा शिथिल केली मात्र या उत्सवात १४ वर्षांहून लहान मुलांना थरावर चढण्यास मनाई केली आहे. अपघात तर कुठेही होऊ शकतात, असे मत नोंदवत न्यायालयाने उंचीवरील मर्यादा उठवण्याचे संकेत दिले. मात्र सुरक्षेबाबतचे आवश्यक ते कायदे आणि निर्णय राज्याच्या विधिमंडळाने घेणे अपेक्षित असल्याचे न्यायालयाने सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईसह राज्यभरात गोविंदांचा थरथराट अनुभवायला मिळणार आहे.

सोमवारी राज्य सरकारने याबाबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात १८ वर्षांऐवजी १४ वर्षांखालील गोविंदांना उत्सवात सहभागी होण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे स्पष्ट केल्यानंतर न्यायालयाने हे आदेश दिले आहेत

दहीहंडी उत्सवादरम्यान सुरक्षेच्या मुद्द्याकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल दोन जनहित याचिकांवर न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्यासमोर सोमवारी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान राज्य सरकारच्या वतीने केंद्र सरकारचे अतिरिक्त महाधिवक्ता तुषार मेहता यांनी बाजू मांडली. त्यांनी गोविंदांच्या वयाबाबत काही बाबी कोर्टाच्या निदर्शनास आणल्या.

बालमजुरी प्रतिबंध नियमन कायदा १९८६ नुसार मानवी मनोऱ्यांत १४ वर्षांपेक्षा लहान मुलांना सहभागी होता येणार नाही, हा सरकारचा संदर्भ कोर्टाने ग्राह्य धरला. सुप्रीम काेर्टाच्या आदेशानुसार गोविंदांच्या सुरक्षेच्या सर्व उपाययोजना, उत्सवादरम्यान अपघात घडू नयेत यासाठीचे प्रतिबंधात्मक उपाय योजले जातील, अशी हमीही राज्य सरकारने दिली.