ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मराठा क्रांती मोर्चामुळे पाचशे शाळांना सुट्टी

मुंबई, दि. ८ - शाळा हवीहवीशी पण वाटते आणि कधी कधी नकोशीपणविद्यार्थ्यांना सुट्टी कधी मिळणार याचीच प्रतीक्षा कायम असते. मुंबईत तर पावसाळ्यात अतिवृष्टीने मिळणारी शाळेला सुट्टी ही विद्यार्थ्यांसाठी पर्वणीच असते. आता मात्र अजून एक अनपेक्षित सुट्टी विद्यार्थ्यांना मिळाली आहे, ती मराठा क्रांती मोर्चामुळे.

बुधवारी ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला होणारी अभूतपूर्व गर्दी लक्षात घेता दक्षिण मुंबईतील जवळपास ५०० शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. पोलिसांनी वाहतुकीमध्ये काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चाची सुरूवात जिजामाता उद्यानापासून होणार आहे. यानंतर हा मोर्चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्गाने खडा पारसी पुतळा, नेसबिट जंक्शन, जे.जे.उड्डाणपूल या मार्गाने आझाद मैदानात पोहोचणार आहे.

या मोर्चासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघाले असून या मोर्चेकऱ्यांमुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर वाहतूक मंदावली आहे. मात्र यानिमित्ताने अनपेक्षितपणे मिळालेल्या सुट्टीमुळे विद्यार्थी सुखावले आहेत.