ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

लाखोंच्या संख्येने मराठा क्रांती मूक मोर्च्याला भायखळा येथून सुरुवात

मुंबई, दि. ९ - मराठा आरक्षणासह अनेक मागण्या घेऊन निघालेल्या मराठा क्रांती मूक माेर्चाची भायखळ्याच्या जिजामाता उद्यानापासून सुरुवात झाली असून हा मोर्चा मुंबईच्या आझाद मैदानाच्या दिशेने निघाला आहे. पाच किलोमीटरचे अंतर पार करून आझाद मैदानात या मोर्चाचा समारोप होणार आहे.

या मोर्चात राज्याच्या काना-काेपऱ्यातून मराठा समाजातील सुमारे २० ते २५ लाख कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. मराठा आरक्षण, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा, अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा अशा विविध मागण्यांसाठी आतापर्यंत राज्यभरात ५७ माेर्चे निघाले असून मुंबईतील हा ५८ वा मोर्चा आहे.

दरम्यान, मुंबईच्या दिशेेने जाणाऱ्या सर्व वाहनांना टोल माफ करण्यात आले आहे. या मोर्चामुळे मुंबईची वाहतूक मंदावली असून काही ठिकाणी वाहतूक कोंडीचा अनुभव मुंबईकरांना मिळत आहे. विविध भागातून मोर्चासाठी आलेल्या कार्यकर्त्यांमुळे लोकलगाड्या तुडुंब भरून वाहत आहेत

जेजे उड्डाणपुलावरून निघून हा मोर्चा आझाद मैदान येथे संपेल. शेवटी समाजाच्या वतीने एक शिष्टमंडळ आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर करेल. मुंबईचे डबेवाले मराठा बांधवांना पाठिंबा देण्यासाठी मोर्चात सहभागी झाले आहेत. यामुळे बुधवारी डबेवाल्यांची सेवा उपलब्ध होणार नाही. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई महापालिका, पोलीस इतर सरकारी यंत्रणा या पार्श्वभूमीवर सज्ज झाली अाहे.