ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मराठा मोर्चाला गालबोट, मोर्चेकऱ्यांकडून उर्से टोल नाक्याची तोडफोड

मुंबई, दि. १० - मुंबईमध्ये लाखोंच्या संख्येने आलेल्या मराठा बांधवानी मोर्चा अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध रीतीने पार पाडून काही तास उलटले नाही तोच संतप्त मोर्चेकऱ्यांनी पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्याची तोडफोड केल्याचा प्रकार बुधवारी रात्री घडला.

याबाबतची माहिती अशी की, टोल नाक्यावरील स्टॉप रॉड एका गाडीवर आदळून गाडीची काच फुटल्याने सुमारे १५० मोर्चेकऱ्यांनी गोंधळ घातला. संतप्त मोर्चेकऱ्यांनी टोल नाक्यावरील तीन ते चार केबिनच्या काचा फोडल्या तर टोलनाक्यावर गाड्या आडव्या लावून मोर्चेकऱ्यांनी काही वेळेसाठी केला या मार्गावर रास्ता रोको केला. तब्बल दोन तास या ठिकाणी तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. पुणे महामार्ग आणि ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने परिस्थिती आटोक्यात आली असून पोलीसांचा तपास सुरु. या घटनेत टोल नाक्याच मोठं आर्थिक नुकसान झाले आहे.