ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

काम रात्री कराल तर कुटुंबातील सदस्याला १० हजार द्या – उच्च न्यायालय

मुंबई, दि. ११ - ध्वनी प्रदूषण नियंत्रण आणि नियामक कायद्याचे आदेश धाब्यावर बसवून सुरु असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या कामाबाबत उच्च न्यायालयाने मेट्रो प्रशासनाला फटकारले आहे. रात्री १० ते सकाळी पर्यंत काम करायचे नाही , जर केल्याचे आढळल्यास प्रत्येक कुटुंबातील सदस्याला दहा हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याची तयारी ठेवा अशा शब्दात मेट्रोच्या प्रशासनाला सज्जड इशारा दिला आहे.

कुलाबा ते सीप्झ हा मेट्रो- प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईतील रहिवाशांना होणारा त्रास लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाने रात्री १० ते सकाळी या काळामध्ये मेट्रो- चे कामकाज बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मेट्रोच्या दिवसरात्र होणाऱ्या घरघरीमुळे कफ परेड इथे राहणाऱ्या नागरिकांना झोप मिळत नसून विविध आजारांनी जखडले आहे.

त्यामुळे नुकसानभरपाई म्हणून कुटुंबातील प्रत्येक सदस्यामागे दहा हजार रुपये नुकसानरभरपाई द्यावी. तसेच मेट्रोचा रात्रीचा आवाज बंद करावा, अशी मागणी या रहिवाशांनी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली होती.कफ परेडमध्ये राहणाऱ्या रॉबिन जयसिंघानिया यांनी ही याचिका दाखल केली होती. ते पत्नी आणि दोन लहान मुलींसोबत कफ परेड भागात राहतात. मशीन्सच्या आवाजामुळे दिवसा त्यांना एकमेकांशी बोलणेही शक्य होत नाही. रात्रीच्या आवाजामुळे शांत झोपही लागत नाही. पुरेशी झोप मिळाल्यामुळे डोकेदुखी, सर्दी याचबरोबर चिडचिड होते. त्यामुळे कुटुंबाचे आरोग्य बिघडल्याची तक्रार सिंघानिया यांनी याचिकेत केली होती.त्यावर न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.