ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

तत्पर जातप्रमाणपत्रासाठी आता रक्ताचे नाते, सरकारचे नवे सूत्र

मुंबई, दि. १२ - जातीची प्रमाणपत्रे मिळविताना येणारासरकारी काम चार दिवस थांबचा कटू अनुभव आता लवकरच हद्दपार होणार असून रक्ताचे नाते असणाऱ्या नातलगांना तत्परतेने जातीची प्रमाणपत्रे देण्यासाठी लवकरच नवा अध्यादेश सरकार काढणार आहे.

जातीची प्रमाणपत्रे मिळताना येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी राज्य सरकार लवकरच स्वतंत्र अध्यादेश काढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. दरम्यान मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारने दिलेल्या सवलतींचा लाभ याच शैक्षणिक वर्षापासून दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात विरोधी पक्षांनी केलेल्या मागणीनुसार निवेदन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पूर्वी राजर्षी शाहू शिष्यवृत्ती योजनेमध्ये केवळ ३४ अभ्यासक्रमांसाठी मराठा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ होत होता. शिवाय त्यात ६० टक्के गुणांची अटही होती. मात्र इतर मागास वर्गांना ५० टक्के गुणांची अट होती ६०५ अभ्यासक्रमांना योजना लागू आहे. तो लाभ मराठा विद्यार्थांना देण्याचा निर्णय असून विनोद तावडेंनी त्याबाबतचे शासन निर्णय झाल्याचे निवेदन केले आहे. इतर मागास वर्गांप्रमाणे दरसाल सहा लाख उत्पन्न असणाऱ्यांच्या पाल्यांनाही या सवलतींचा लाभ मिळेल. तसेच या शैक्षणिक वर्षापासून या सवलती लागू असतील असे त्यांनी स्पष्ट केले.