ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

राज्यात येत्या तीन दिवसात मुसळधार पाऊस, हवामानाचा अंदाज

मुंबई, दि. १६ - येत्या तीनदिवसात  राज्यात मुसळधार पावसाची एण्ट्री होईल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. येत्या शुक्रवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात पावसाचं कमबॅक होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पीकं करपल्यानं हतबल झालेल्या बळीराजालाही दिलासा मिळणार आहे. तसंच मुंबई आणि उपनगरांमध्ये पुढच्या २४ तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. 

बिहार-उत्तर प्रदेशात पावसाचं थैमान सुरु असताना, महाराष्ट्राचे डोळे मात्र मोठ्या पावसाकडे लागले आहेतमराठवाडा आणि विदर्भातील जिल्हे ऐन पावसाळ्यातही कोरडे ठाक पडले आहेत. तर पावसाने दडी दिल्याने पश्चिम महाराष्ट्रातही जमीनीला भेगा पडत आहेत.

दुष्काळामुळे शेतकरीवर्ग पूरता हतबल झाला आहे. लातूरच्या औसा तालुक्यात भावांनी साडे सहा एकरात सोयाबीन पेरलं, मात्र वरूणराजानं दही मारल्यानं लाख खर्चून पेरलेल्य़ा सोयाबीनची माती झालीजुलैमध्ये ३५५ पैकी तब्बल २२३ तालुक्यांमध्ये सरासरीच्या ७५ टक्केही पाऊस झाला नाही. त्यात मराठवाडा आणि विदर्भातील अनेक तालुक्यांमध्ये सरासरीच्या २५ टक्केही पावसानं कृपा दाखवली नाही.

त्यामुळे घाम गाळून, कष्ट करून पेरलेल्या पीकाची डोळ्यासमोर अशी माती होत असल्यानं बळीराजा हतबल झाला आहे.