ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

मुंबई हायकोर्टाकडून बैलगाडी शर्यतींना मनाई

मुंबई, दि. १६ - यंदाही राज्यात बैलगाडी स्पर्धेसाठी परवानगी देण्यास मुंबई हायकोर्टानं मनाई केली आहे. त्यामुळे यंदा राज्यात कोठेही या स्पर्धांच्या आयोजनाची परवानगी देण्यास मनाई करण्यात आली आहे.

राज्य सरकारनं यासंदर्भात अधिसूचना जरी काढली असली तरी जोपर्यंत बैलगाडी स्पर्धांदरम्यान बैलांना इजा होणार नाही याविषयी सरकार नियमावली बनवत नाहीत आणि आमच्यासमोर सादर करून आम्ही परवानगी देत नाही तोपर्यंत बैलगाडी स्पर्धांना परवानगी नाही.’ असं हायकोर्टानं स्पष्ट करत आठवड्यांत राज्य सरकारला यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

राज्य  सरकारनं बैलगाडी स्पर्धांसाठी काढलेल्या अधिसूचनेला मुंबई हायकोर्टात आव्हान देणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. अजय मराठे यांनी ही याचिका दाखल केली आहेबैलगाडी स्पर्धा हा क्रूर खेळ असून यामध्ये बैलांना इजा होत असल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. ‘बैल हा धावण्याकरता नाही तर कष्टाची कामं करण्यासाठीचा प्राणी आहे.’ असंही याचिकाकर्त्यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.

मुंबई हायकोर्टानं बैलगाडी स्पर्धेला घातलेल्या बंदीला राज्य सरकारनं आव्हान दिलं नव्हतं, याचाच अर्थ राज्य सरकार बैलगाडी स्पर्धा बंदीच्या बाजूने असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे. तसंच सुप्रीम कोर्टानेही बैलगाडी स्पर्धा हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ नसल्याचं म्हटले होतं याचा उल्लेखही मराठे यांनी आपल्या याचिकेत केला आहे.