ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

भारतात आणल्यानंतर कसाबच्या बॅरकमध्ये माल्ल्याचा मुकाम

मुंबई, दि. १६ - भारतात अब्जावधींचे कर्ज बुडवून ब्रिटनला स्थायिक झालेल्या कर्जबुडव्या विजय माल्ल्याला भारतात आणल्यानंतर विजय माल्ल्याला कुठे ठेवणार आणि त्या तुरुंगात काय व्यवस्था आहे, याचा तपशील भारताने लंडनच्या न्यायालयात दिला आहे. त्यानुसार, २६/११ हल्ल्याचा एकमेव जीवंत पकडलेला आणि नंतर फाशी देण्यात आलेला दहशतवादी अजमल कसाब आर्थर रोड तुरुंगातील ज्या बॅरकमध्ये होता, त्याच बॅरकमध्ये माल्ल्याला ठेवले जाणार आहे.

भारतात विजय माल्ल्याला आणण्यासाठी मुत्सद्दी आणि न्यायलयीन लढा सुरू आहे. त्याच अंतर्गत लंडनच्या एका न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी भारताने विजय माल्ल्याला कोणत्या तुरुंगात आणि कशा प्रकारे ठेवणार याची माहिती दिली आहे. केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी न्यायालयात याबाबतचा अहवाल सोमवारी लंडनच्या न्यायालयात दाखल केला आहे. जुलै महिन्यात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि सीबीआयने लंडन न्यायालयात माल्ल्याविरोधातील महत्वाचे पुरावे सादर केले होते. यामध्ये जून महिन्यात ईडीने दाखल केलेल्या चार्जशीटचाही उल्लेख होता.