ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

चकमक फेम प्रदीप शर्मा पुन्हा पोलीस सेवेत दाखल

मुंबई, दि. १७ - नऊ वर्षांपूर्वी पोलीस दलातून निलंबित केलेले आणि शंभरहून अधिक गुंडांचा खात्मा करणारे चकमक फेम प्रदीप शर्मा पुन्हा महाराष्ट्र पोलीस सेवेत दाखल झाले आहेत. पोलीस महासंचालकांच्या मुख्यालयात त्यांनी पदभार स्वीकारला. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसाठी काम करत असल्याचा त्यांच्यावर आरोप होता; तसेच बनावट चकमक प्रकरणात त्यांना निलंबित करण्यात आले होते.

जवळपास ३१२ चकमकींमध्ये शर्मा यांनी भाग घेतला होता. शंभरहून अधिक गुंडांचा त्यांनी खात्मा केला आहे. त्यात लष्कर--तोयबा या दहशतवादी संघटनेसह आंतरराष्ट्रीय गुन्हेविश्वातील गुंडांचा समावेश आहे. त्यांच्यावरडीकंपनीसाठी काम करत होते, असाही आरोप होता.

नोव्हेंबर २००६ मधील लखनभैया चकमक बनावट असल्याचे तपासात समोर आले होते. मुंबई पोलीस दलातील १३ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती. प्रदीप शर्मांचाही त्यात समावेश होता. या प्रकरणात त्यांना २००८ मध्ये पोलीस सेवेतून निलंबित केले होते. त्यानंतर त्यांची या प्रकरणातून सुटका करण्यात आली होती.