ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

अॅक्सिस बँकेचा धमाका, गृहकर्जाचे १२ हप्ते माफ

मुंबई, दि. १८ - मोबाईल कंपन्यांप्रमाणे बँकिंग क्षेत्रातही मोठी स्पर्धा सुरु असल्याचं दिसून येत आहे. त्यातल्या त्यात गृहकर्जाबाबतीत तर या स्पर्धेने टोक गाठलं आहे. खासगी क्षेत्रातील आघाडीच्या अॅक्सिस बँकेने गृहकर्जदारांना तब्बल १२ मासिक हप्ते माफ करण्याची घोषणा केली आहे. मात्र त्यासाठी तुमचं गृहकर्ज ३० लाखांवर असायला हवं, शिवाय त्याचा एकही हप्ता तुमच्याकडून थकायला नको, अशी अट आहे.

अॅक्सिस बँकेने शुभारंभ ही नवी योजना आणली आहे. त्याअंतर्गत ही ऑफर देण्यात आली आहे. मात्र सलग वर्षभराचे हप्ते माफ होणार नाहीत, तर कर्जदाराने नियमित कर्ज भरलं, तर त्याला चौथ्या, आठव्या आणि बाराव्या वर्षी असे चार-चार महिने सूट दिली जाईल.हे कर्ज घर खरेदी, दुरुस्ती, बांधकाम किंवा जमीन घेऊन बांधकामासाठीच वापरता येऊ शकतं. या गृहकर्जाचा व्याजदर .३५ % असेल.

जर तुमचं दुसऱ्या बँकेत गृहकर्ज असेल, तर ते अॅक्सिस बँकेत वर्ग करण्याची ऑफरही देण्यात आली आहे. तुम्ही ३० लाख रुपयांचं गृहकर्ज २० वर्षांसाठी .३५ टक्के व्याजदराने घेतलं, तर त्याचा मासिक हप्ता (ईएमआय) २५ हजार ७५१ रुपये असेल. २० वर्षांसाठी तुम्हाला व्याजासह एकूण ६१ लाख ८० हजार १४१ भरावे लागतील. मात्र शुभारंभ योजनेनुसार तुम्हाला १२ हप्त्यांचे लाख हजार १२ रुपये माफ होतील. या योजनेनंतर तुम्हाला व्याजासह एकूण ६१ लाख ८० हजार १४१ ऐवजी ५८ लाख ७१ हजार १२९ रुपये परतफेड करावे लागतील.