ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त लवकरच

मुंबई, दि. १९ - भाजपमध्ये काँग्रेस नेते नारायण राणे हे जाणार असल्याच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. येत्या २७ ऑगस्टला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबई दौ-यावर येत असून, राणे त्यावेळी भाजपमध्ये प्रवेश करु शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे.

यासंदर्भातील वृत्त एबीपी माझा वाहिनीने वृत्त दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार भाजपमध्ये नारायण राणे यांनी प्रवेश केला तर त्याचा निश्चित फायदा भाजपला कोकणात होईल पण मंत्रिमंडळात त्यांचे स्थान काय असेल हा प्रश्नच आहे. कारण राणेंचा एकूणच स्वभाव लक्षात घेता ते कमी महत्वाच्या खात्यावर समाधानी होणार नाहीत असे राजकीय विश्लेषकांनी सांगितले.

भाजपची कोकणात देवगड वगळता फारशी ताकद नाही. भाजपला राणे यांच्या प्रवेशाने तिथे बळ मिळेल. सत्तेचे बळ मिळाले तर, थेट शिवसेनेला अंगावर घेण्याची क्षमता राणेंमध्ये असल्यामुळेच पक्षात राणेंना प्रवेश देण्याचा गांर्भीयाने विचार सुरु आहे. शिवसेनेचे वारे सध्या कोकणात असले तरी, अलीकडच्या काळात राणेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने येथे ब-यापैकी यश मिळवले आहे.