ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

राणेंच्या भाजप प्रवेशावर गुलाबराव पाटील म्हणतात, इनसे सावधान रहना

जळगाव, दि. २१ - सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चेवर तोफ डागली असून नारायण राणे हे कुठल्याही पक्षात गेले, तरी ते कुठल्याच पक्षाचे होऊ शकत नाहीत. ते कुठे होते ? कुठे गेले ? आता कुठे चालले आहेत, याने काही फरक पडत नाही. बाळासाहेबांनी राणेंना शिवसेनेमध्ये असताना मुख्यमंत्रीपद दिले. काँग्रेसने महसूल मंत्री केले. त्यांचा मुलगा आमदार झाला. तरीही राणेंचे मन भरत नाही, असे पाटील यांनी म्हटले आहे.

आता भाजपमध्ये नारायण राणे जाणार असतील तर इनसें सावधान रहना ! असा इशारा पाटील यांनी भाजपला दिला आहे. भाजपला पक्ष वाढवायचा असल्यामुळे ते वाल्याचा वाल्मिकी करत आहेत. राणेंच्या रूपाने अजून एक वाल्मिकी तयार होत आहे अशी टीका त्यांनी भाजपवर केली.