ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

भाजपने मिरा-भाईंदर मनी आणि मुनीच्या जोरावर जिंकले- शिवसेना

मुंबई, दि. २३ - शिवसेनेने मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवणाऱ्या भाजपवर गंभीर आरोप केला असून भाजपने मिरा-भाईंदर महापालिका निवडणूक मनी आणि मुनी यांच्या जोरावर जिंकली असल्याचा घणाघात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज केला आहे. त्यांनी या दरम्यान निवडणुकीदरम्यान भाजपचा प्रचार करणाऱ्या जैन मुनींवरही शेलक्या शब्दांत टीका केली.

मिरा-भाईंदरची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने जैन मुनींची मदत घेतली. जातीच्या आधारावर या जैन मुनींनी मते मागितल्यामुळेच या निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला. पण मतांच्या राजकारणासाठी एखाद्या जैन मुनीसमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोटांगण घालणे, हा आचारसंहितेचा भंग आहे. या निवडणुकीत शिवसेनेनेही आठ जागांवर जैन समाजातील उमेदवार उभे केले होते. त्यापैकी एक उमेदवार जिंकला तर अन्य सात उमदेवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले. शिवसेनेच्या पाठिशी अमराठी समाज नसल्याचा प्रचार केला जात आहे. शिवसेनेपासून या मतदारांना तोडण्यासाठीचा हा डाव आहे. पण शिवसेनेविरोधात यापुढे एक शब्दही उच्चारला तर त्यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असे राऊत यांनी ठणकावले.