ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सत्तेला राम राम ठोकणार राजू शेट्टी, संघटनेची आज बैठक

मुंबई, दि. २९ - अखेर सत्तेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी राम राम ठोकणार असून शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक उद्या पुण्यात बोलावण्यात आली आहे. सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा या बैठकीनंतर केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून सदाभाऊ खोत यांची हकालपट्टी केल्यानंतर खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले होते. सत्तेतील स्वभिमानी शेतकरी संघटनेचे स्थान काय, याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी शेट्टींनी पत्राद्वारे केली होती. पण शेट्टींच्या पत्राला अद्याप मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले नाही.

त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सरकारसोबत शेतकरी कर्जमाफी, हमीभाव, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी इत्यादी मुद्द्यांवरुन मतभेद वाढले होते. त्यातच पुणे ते मुंबई आत्मक्लेश यात्रा काढत राजू शेट्टींनी सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत जाब विचारला होता.

२०१९मध्ये लोकसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या असल्यामुळे ते राज्यभर दौरे करुन संघटना बांधणीचे काम हाती घेणार आहेत. शिवाय, विरोधी पक्षाची पोकळी भरुन काढण्याचे काम हाती घेणार असून, सरकारला धारेवर धरणार असल्याचीही माहिती मिळते आहे.