ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

एसटीतील महिला कर्मचाऱ्यांना मिळणार ९ महिने प्रसूती रजा

मुंबई, दि. २९ - एसटी महामंडळात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी परिवहन खात्याने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांना हक्काच्या रजेसोबत आता महिने अतिरिक्त पगारी प्रसूती रजा मिळणार आहे. म्हणजेच आता एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांना महिने हक्काची रजा आणि त्यासोबत महिने अतिरिक्त रजा, अशी एकूण महिन्यांची प्रसूती रजा मिळणार आहे.

हा निर्णय परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. एसटी महामंडळाने मातृत्त्व कोणत्याही स्वरुपात हिरावून घेतले जाऊ नये, त्याचा सन्मान झालाच पाहिजे, त्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले आहे.

या निर्णयाचं परिपत्रक एसटी मंहामंडळाने जारी केले आहे. सरकारच्या या निर्णयाचे एसटीतील महिला कर्मचाऱ्यांनीही स्वागत केले आहे. एसटीतील महिला कर्मचाऱ्यांना सरकारी नियमानुसार महिन्यांची प्रसूती रजा दिली जाते. ती रजा कधी घ्यायची हा संबंधित महिला कर्मचाऱ्याचा निर्णय असतो. बहुतांश महिला मुलाच्या जन्मानंतर बालसंगोपनासाठी या रजेचा वापर करतात. पण प्रसूतीपूर्व रजा मिळत नसल्याने एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांना गरोदर अवस्थेतच प्रवास करावा लागतो. त्यामुळे आता अतिरिक्त तीन महिन्यांची प्रसूती रजा देण्यात आल्याने एसटीतील महिला कर्मचाऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे.