ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे वीज कनेक्शन बंद करण्याचे आवाहन

मुंबई, दि. २९ - सध्या मुंबईत मुसळधार पाऊस सुरु असून त्यात गणेशोत्सव देखील सुरु आहे. शहरातील चौकाचौकात या काळात सार्वजनिक गणेश मंडळांचे मंडप टाकलेले आहेत. पण मंडपात पावसामुळे पाणी शिरले असेल तर संभाव्य दुर्घटना घडू नये यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव समितीकडून सर्व गणेश मंडळांना आपले वीज कनेक्शन तत्काळ बंद करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

पाण्याचा निचरा होईपर्यंत गणेश मंडळांना वीज कनेक्शन बंद ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. गणेश मंडळांचे मंडप हे लोखंडी पत्र्यांची शेड असतात. त्यातच अख्ख्यी तुंबल्याने अनेक सखल भागातील गणेश मंडळांच्या मंडपांमध्येही पाणी शिरले आहे. अशा परिस्थितीत चुकून वीजप्रवाहाचा पाण्याशी संपर्क झाल्यास मोठा अनर्थ ओढवू शकतो त्यामुळे उत्सव काळात विपरीत घटना घडू नये यासाठी शहरातील सर्व गणेश मंडळांना काळजी घेण्याचे आवाहनही सार्वजनिक गणेशोत्सव समितीकडून करण्यात आले आहे.