ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

महापौर म्हणतात, भौगोलिक परिस्थितीमुळे मुंबई तुंबली

मुंबई, दि. ३० - मुसळधार पावसामुळे मुंबईचे कंबरडे मोडले, पण रात्रीत उसंत घेतल्यानंतर आज (बुधवारी) सकाळपासून पुन्हा जोर धरला आहे. सकाळपासून पश्चिम मुंबईत पाऊस सुरु झाला आहे. दरम्यान हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे गरजेचे असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दरम्यान मुंबईचे महापौर विश्वनाथ पांडुरंग महाडेश्वर यांनी सांगितले की, मुंबईचे हाल भौगोलिक परिस्थितीमुळे झाले असून मुंबईकरांनी मंगळवारी झालेल्या कोसळधार पावसात २६ जुलै २००५ची पुनरावृत्ती अनुभवली. पावसामुळे लाखो चाकरमानी बेहाल झाले. काही जण तर अजूनही घरी पोहोचलेले नाहीत.तुमचा नातेवाईक किंवा मित्रमंडळीतील कुणी बेपत्ता असेल तर आम्हाला माहिती द्या, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.