ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मुंबई तुंबली तेव्हा पालिकेतील सत्ताधीश कुठे लपून बसले होते - शेलार

मुंबई, दि. ३१ - मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी पालिकेच्या खुर्च्यामधीलसत्ताधीशमुंबई तुंबली तेव्हा कुठे लपून बसले होते, असा सवाल करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्याचबरोबर त्यांनीउद्धटभाषा बोलण्यापेक्षा मुंबईकरांची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. मुंबईचे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी भाजपचे नगरसेवक, आमदार रस्त्यावर काम करीत होते, असे शेलार यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी मुंबईतील संपूर्ण परिस्थितीची माहिती देण्यासाठी काल पत्रकार परिषद घेतली. याच पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे पत्रकारावर भडकल्याचे दिसून आले. पाऊस जास्त पडल्याने मुंबई पाण्याखाली गेली? हेच उत्तर किती वेळा ऐकायला मिळणार आहे? असा प्रश्न विचारताच उद्धव ठाकरे यांचा पारा मात्र चांगलाचा चढला.

आशिष शेलार यांनी यानंतर ट्वीटरच्या माध्यमातून शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत अप्रत्यक्षपणे टीका केली. याबाबत त्यांनी अनेक ट्वीट केले आहेत. ‘उद्धटभाषा बोलण्यापेक्षा नम्रपणे माफी मागावी. असा सल्ला आशिष शेलार यांनी ट्विटरवरुन उद्धव ठाकरेंना दिला आहे. पालिकेच्या खुर्च्यांमधील सत्ताधीश कुठे लपुन बसले होते? मॅनहोलमध्ये? रस्त्यावर भाजपचे आमदार, नगरसेवक लोकांसाठी झटत होते. अर्थात कर्तव्य म्हणूनच!, असे ट्वीट करत शेलार यांनी शिवसेनेवर थेट निशाणा साधल्यामुळे आता आशिष शेलार यांच्या या टीकेला शिवसेना काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.