ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

वरळीत सापडला बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉ. अमरापुरकरांचा मृतदेह

मुंबई, दि. ३१ - वरळी कोळीवाडा समुद्रात बॉम्बे हॉस्पिटलमधील पोटवकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृतदेह सापडला असून डॉ. अमरापूरकर मंगळवारी दुपारी .३० वाजल्यापासून बेपत्ता होते. २९ ऑगस्टला मुंबईच्या रस्त्यांवर मुसळधार पावसामुळे पाणीच पाणी झाले होते. अनेक लोक वाहने रस्त्यावर सोडून चालत घरी निघाले होते. दुपारी .३० च्या सुमारास प्रभादेवीला आपल्या राहत्या घराच्या दिशेने बॉम्बे हॉस्पिटलचे पोटविकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकरही निघाले होते.

अमरापूरकरांचा लोअर परेलपासून प्रभादेवीपर्यंत चालत जाऊन घर गाठण्याचा विचार होता. त्यांनी आपली गाडी एलफिन्स्टन पश्चिम भागात सोडली होती. अमरापूरकर गुडघाभर पाण्यातून वाट काढत चालत राहिले. पण ते घरी पोहोचलेच नाहीत. महापालिका कर्मचाऱ्यांनी पाण्याचा निचरा व्हावा म्हणून एल्फिन्स्टनमधील मॅनहोलचे झाकण काढले होते. लोकांच्या माहितीसाठी त्यात बांबू लावला होता. पण अंदाज आल्याने डॉ. अमरापूरकर त्यात कोसळले.