ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांवर भाजप खासदाराची टीका

नागपूर, दि. १ - भाजपचे खासदार नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केले आहेत. नाना पटोले यांनी महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांची कीव येते. केंद्रातून सर्वात कमी पैसा महाराष्ट्रात आला. महाराष्ट्राच्या सरकारला खासदारांची किंमत नाही, असे वक्तव्य केले आहे. मी मुख्यमंत्र्यांकडे केंद्राच्या निधीबाबत विषय उपस्थित केला तर त्यांनी खासदारांची बैठक बोलावणेच बंद करून टाकल्याची टीका त्यांनी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. मुख्यमंत्री विदर्भाचा असो की कुठल्याही भागाचा मुख्यमंत्री पद मिळाले की तो व्यक्ती बदलतो, अशी थेट टीका नाना पटोले यांनी केली आहे.

खासदार नाना पटोले नागपूरमध्ये आयोजीत विदर्भातील सिंचन सुविधा आणि शेतकऱ्यांचे अश्रृ या कार्यक्रमात बोलत होते. नाना पटोले यांनी या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी त्यांनी आयोजित केलेल्या बैठकीत शेतीचे वास्तव सांगितले तर मोदी माझ्यावर भडकले, कारण त्यांना असे काही ऐकण्याची सवय नसल्याचे नाना पटोले यांनी म्हंटले आहे. सध्या मी पक्षाच्या हिटलिस्ट वर असून मी आता कुणाला घाबरत नसल्याचेही पटोले म्हणाले.