ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

आता स्मार्ट युनिफॉर्ममध्ये दिसणार देशभरातील पोलीस

मुंबई, दि. १ - सध्या ब्रिटीशकालीन खाकी वर्दी देशभरातील पोलिस परिधान करत आहेत. पण आता देशभरातील पोलिसांची खाकी वर्दी आता इतिहासजमा होणार आहे. लवकरच पोलिसांच्या गणवेशात बदल करण्यात येणार असून यापुढे आता पोलिस कर्मचारी आपल्याला स्मार्ट युनिफॉर्ममध्ये दिसणार आहेत.

सर्व हवामानात आरामदायी ठरणारा डिझायनर गणवेश आता पोलिसांना दिला जाणार असून हे काम अहमदाबादमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन या संस्थेकडे सोपवण्यात आले आहे. सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशातील पोलिस आणि निमलष्करी दलासाठी नवा गणवेश ही संस्था बनवणार आहे. ब्युरो ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या सहकार्याने वर्दीचे नमूने तयार करण्यात आले आहेत. यात शर्ट, पॅण्ट, पट्टा, टोपी आणि जॅकेटचा समावेश आहे. याशिवाय रेनकोट आणि हेडगिअरचे डिझाईनही बनवले आहे. राज्यांच्या सर्व पोलिसांना हे डिझाईन शेअर केले असून आपल्या पसंतीने ते गणवेश निवडू शकतात.

नऊ राज्यांकडून मिळालेल्या प्रतिक्रियांनुसार, सध्याच्या वर्दीमध्ये अनेक अडचणी आहेत. पहिली बाब म्हणजे देशातील पोलिसांच्या वर्दीत समानता नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांच्या गणवेशाचे कापड फारच जाड असल्याने उन्हाळ्यात त्रास होता. याशिवाय वर्दीत जास्तीत जास्त गोष्टी ठेवण्याची पर्यायी जागा नाही. पोलिसांची टोपी लोकराची असल्याने उन्हाळ्यात डोकेदुखीचे कारण ठरते. तर हेल्मेट एवढे जड आहेत की आपत्कालीन परिस्थितीत ते घालणे अडचणीचे ठरते. पट्टाही फार जड असल्याने तो घालून वाकता येत नाही. जगभरातील इतर देशांमधील पोलिसांच्या पट्ट्यात फोन ठेवण्याची जागा आणि स्मार्ट कीज असते, तशीच सोय देशातील पोलिसांच्या गणवेशात असावी.

पोलिसांसाठी बुटे देखील एक समस्या बनली आहे. चामड्याचे बुट जास्त वेळ घालणे सोपे नसटे. या खाकी रंग प्रायव्हेट एजन्सी आणि इतर विभागातील लोकही वापरतात. आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर म्हणाल्या की, खाकी वर्दीवर फारच टीका होते. यात बदल होणे आवश्यक असून सर्व प्रकारच्या हवामानात परिधान करण्यासाठी सध्याची वर्दी पोलिसांसाठी योग्य नाही. याला पर्याय आणणे गरजेचे आहे.