ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

थर्माकोल, प्लॅस्टिकमुळे मुंबई पाण्याखाली - उद्धव ठाकरे

मुंबई, दि. २ - तुफान पावसामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले शिवाय सर्वत्र पाण्याने वेढली गेली. प्रारंभी किलोमीटरचे ढग मुंबईच्या आकाशात होते असे विधान करून शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सारवासारव केली नाही तोच त्यांनी आता दुसरा मुद्दा हाती घेतला आहे. मुंबई तुंबण्याला प्लॅस्टिक, थर्माकोल हेच कारणीभूत होते त्यामुळे आता प्लॅस्टिक बंदीची मागणी त्यांनी केली आहे.

प्लॅस्टिक आणि थर्माकॉलचा वापर खूप वाढला असून मुंबईत झालेल्या मुसळधार पावसात हेच प्लॅस्टीक आणि थर्माकॉल अनेक भागांत गच्च बसल्याने पाणी जायला जागाच उरली नाही. हे अरिष्ट प्लॅस्टीकवर पूर्ण बंदी आणली तरच टळेल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याबाबत गांभीर्याने विचार करावा. याबाबत कडक कायदा आहे. परंतु त्याची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया साधनांचे शहरातले पहिले प्रदर्शन वरळीतल्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब येथे भरले आहे. या प्रदर्शनाबद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुंबईला खऱ्या अर्थाने सुंदर बनवण्यासाठी अशा प्रकारच्या प्रदर्शनाची गरज असल्याचे सांगितले. तसेच घनकचरा व्यवस्थापनाची सुरुवात प्रत्येक मुंबईकराने आपल्या घरापासून करावी, असे सांगितले.