ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांचं निधन

मुंबई, दि. २ - आचार्य अत्रे यांच्या कन्या, ज्येष्ठ कवयित्री आणि सामाजिक कार्यकर्त्या शिरीष पै यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं. त्या ८८ वर्षांच्या होत्या. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी काव्यक्षेत्रात शिरीष पै यांचं मोठं योगदान आहे. हायकु हा अल्पाक्षरी जपानी काव्यप्रकार मराठीत लोकप्रिय करण्याचं श्रेय शिरीष पै यांनाच जातं. त्यांनीच हा काव्यप्रकार मराठीत प्रथम आणला आणि रुजवलाही. 'कधीपासून करतोय कावकाव, खिडकीवरला कावळा... भरुन आलाय त्याचाही गळा...' ही शिरीष पै यांनी आपल्या हायकुत आणलेली तरलता रसिकांना एकदम भावली होती आणि मराठीत काही काळ हायकुंची लाटच आली होती
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीदरम्यान १९५६ मध्ये आचार्य अत्रे स्थानबद्ध झाले होते. ते चार महिन्यांनी सुटले. या काळात शिरीष पै यांनी 'नवयुग'ची जबाबदारी अत्यंत कौशल्याने सांभाळली होती.