ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

३ वर्षे झाली तरीही मंत्रिमंडळात गरजेपोटी प्रयोग सुरू – शिवसेना

मुंबई, दि. ४ - रविवारी मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार पार पडला. अनेक मंत्रीपदात यामध्ये फेरबदल करण्यात आले. शिवसेनेने या विस्तारावरून मोदी सरकारवर सामनामधून निशाना साधत वर्षे झाली तरीही मंत्रिमंडळात गरजेपोटी प्रयोग सुरू आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाचा हा विस्तार म्हणजे पत्ते पिसण्याचा खेळ झाला असल्याची टीका केली आहे.

कोणत्याही घटक पक्षाचा काल झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात समावेश करण्यात आला नव्हता. संजय राऊत यांनी त्यावर कडाडून टीका केली होती. शिवसेनेने त्यानंतर अपेक्षेप्रमाणे मुखपत्र सामना मधून भाजपवर निशाणा साधला. मंत्रिमंडळाचा विस्तार बदल्या-बढत्यांचा उत्सव असून तो पत्ते पिसल्यासारखा झाला आहे. एखादा गुलाम राजा होणे आणि राजा गुलाम होण्याचा हा खेळ असल्याचा टोला लगावला आहे.

निवडणुका जिंकणे सरकारे बनवणे हाच सध्या राजकीय, पण राष्ट्रीय खेळ झाला आहे. त्यामुळे सरकारी पटावरील प्यादीही त्याच पद्धतीने बसवली चालवली जातात. मंत्र्याचे वय वाढल्याने मंत्रालयाची कामे नीट होत नसेल तर मग ज्यांचे वय वाढले नाही जे तरुण आहेत, त्यांच्याकडून असे कोणते तेज फाकले गेले आहे? असा खरमरीत सवालही यावेळी विचारण्यात आला.

अच्छे दिनाचा चमत्कार होण्याच्या प्रतीक्षेत देश आहे. मात्र केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार ही भारतीय जनता पक्षाची राजकीय गरज होती. ती पूर्ण केली गेली इतकेच. त्याचा अच्छे दिन आणण्याशी कसलाही संबध नाही. हा मंत्रिमंडळ विस्तार, बदल्या-बढत्यांचा उत्सव होता तो रविवारी संपला अशी टीका करण्यात आली आहे.