ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

स्टार इंडियाकडे आयपीएलचे सर्व मीडिया हक्क

मुंबई, दि. ४ - आयपीएल प्रक्षेपणाचा मीडिया हक्काचा लिलाव स्टार इंडियाने जिंकला असून प्रक्षेपण हक्कासाठी सर्वाधिक १६ हजार ३४७.५० कोटींची बोली स्टार इंडियाने लावली. स्टार इंडियाला या विक्रमी बोलीमुळे आयपीएल प्रक्षेपणाचे हक्क मिळाले आहेत. २०१८ ते २०२२ या पाच वर्षांसाठी स्टार इंडियाकडे हे हक्क राहतील.

२४ कंपन्यांनी या लिलावासाठी सहभाग नोंदवला होता. मात्र त्यापैकी १४ कंपन्याप्रत्यक्ष आर्थिक बोलीसाठी सज्ज होत्या. पण पात्रता फेरीत त्यापैकी एक कंपनी आऊट झाली. उरलेल्या १३ कंपन्यांनी आयपीएलचे हक्क आपल्याला मिळावे यासाठी जोरदार प्रयत्न केले, पण स्टार इंडियाने या सर्वांवर मात केली. या लिलावात सोनी, बी स्पोर्ट्स, सुपरस्पोर्ट, फॉलो ऑन, Yupp TV, टाईम्स इंटरनेट, फेसबुक, एअरटेल, BAM Tech, इको नेट, परफॉर्म ग्रुप, रिलायन्स जिओ अशा मोठ्या कंपन्या सहभागी झाल्या होत्या.

अमेझॉन, ट्विटर, डिस्कव्हरी, फेसबुक, एअरटेल यासारख्या दिग्गज कंपन्यांनी डिजीटल हक्कांसाठी प्रयत्न केले. मात्र टीव्ही, डिजिटल संपूर्ण भारत आणि जगभरातील सर्व मीडिया हक्क मिळवण्यात स्टार इंडिया यशस्वी झाली.