ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सोशल मीडियात हनीप्रीतला मुंबईतून अटक केल्याची अफवा

मुंबई, दि. ५ - तुरुंगात असलेल्या राम रहीम याची मानलेली मुलगी हनीप्रीत हिच्या अटकेच्या अफवांनी आता जोर धरला असून पोलिसांनी मुंबईतून तिला अटक केली असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली आहे. पण याबाबत कोणतीही पुष्टी पोलिसांनी अद्याप दिलेली नाही.

याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वेष बदलून हनीप्रीत ऑस्ट्रेलियाला पळून जाण्याच्या तयारित असतानाच छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोलिसांनी तिला अटक केली. पोलिसांनी तिच्या जप्त केलेल्या पासपोर्टवर तिचे नाव प्रियंका तनेजा लिहिले होते. अशी अफवा सोशल मीडिया रविवारपासून पसरली आहे.

हनीप्रीत विरोधात हरयाणा पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी केली आहे. पंचकुलामध्ये तिच्यावर हिंसा भडकवण्याचा तसेच राम रहीमला न्यायालयतून पळवून नेण्याचा कट आखल्याचा आरोप आहे. २५ ऑगस्टला जेव्हा राम रहीमला तुरुंगात पाठवण्यात आले तेव्हा हनीप्रीत त्याच्याबरोबर होती. ती राम रहीमसोबत हेलिकॉप्टरमध्ये बसली होती. तुरुंगातही ती अडीच तास त्याच्यासोबत होती. त्यानंतर धोका असल्याने तिला बाहेर जाण्यास सांगण्यात आले. तेव्हापासून ती गायब आहे.