ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

राज्यभरात विसर्जना दरम्यान १५ जणांचा मृत्यू

मुंबई, दि. ६ - गणेश विसर्जनाच्या दिवशी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांची अलोट गर्दी लोटली होती. मात्र काही ठिकाणी अपघात झाल्याने या सोहळ्याला गालबोट लागलं आहे. राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

आळंदीच्या हद्दीतील खेडमध्ये घरगुती गणपती विसर्जन करण्यास गेलेला १८ वर्षीय तरुण इंद्रायणी नदीत बुडाला. अक्षय अनिल वरपे असं त्याचं नाव आहे. दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. एनडीआरएफचे जवान या तरुणाचा शोध घेत आहेत. तसेच गायधरा तलावात दोन मुले गणपती विसर्जनावेळी बुडाली होती. रोहित संतोष जगताप ओमकार संतोष जगताप अशी या २ भावंडांची नावे आहेत. त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा शोध सुरु आहे. हा तलाव वडकी परिसरातील आहे.

जगताप डेअरीजवळ कस्पटे वस्ती येथे दोन मुले बुडाली. औंध अग्निशमन केंद्रातील जवानांनी एक मृतदेह पाण्याबाहेर काढला आहे. दुसऱ्या मृतदेहाचा शोध सुरु आहे.

गणपती विसर्जनासाठी गेलेल्या सागर धनगर आणि योगेश धनगर या दोन तरुणांचा धरणात बुडून मृत्यू झाला. जामनेर तालुक्यातील शेंदुर्णीमध्ये ही घटना घडली.

शिवनाई तलावात गणपती विसर्जन करताना तीन तरुण बुडाले. आदर्श किर्तीशाई, सागर तेलभाते, राजेश गायकवाड अशी त्यांची नावे आहेत. तिघांचेही मृतदेह सापडले आहेत. गोदावरी नदीपात्रात तरुण बुडाल्याची माहिती आहे. गणेश विसर्जनाच्या वेळी दौलताबाद तलावात बुडून आकाश साठे या १४ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. औरंगाबादेत तीन घटनांमध्ये पाच जणांना प्राण गमवावे लागले आहेत.

गणपती विसर्जनावेळी किशोर सोनार या २३ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दारणा नदीपात्रात बाप्पासोबत सेल्फी घेण्याच्या नादात तोल जाऊन पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मुंगसरे गावाजवळील डबक्यात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला. दोघा मित्रांसोबत घरच्या गणपतीचे विसर्जन करायला गेला असता गणेश मराळे हा १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.

Posted On: 06 September 2017