ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सालेमला २५ वर्षांची शिक्षा

मुंबई, दि. ७ - १२ मार्च १९९३ ला मुंबईला रक्तरंजीत करणाऱ्या कुख्यात गँगस्टर अबू सालेमसह त्याच्या साथीदारांना न्यायालयाने आज शिक्षा सुनावली. विशेष टाडा न्यायालयाने मुंबईच्या मारेकऱ्यांना शिक्षा ठोठावली. या खटल्यात सर्वाचं लक्ष लागलं होतं ते म्हणजे अबू सालेमकडे. अबू सालेमला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी सीबीआयने केली होती. मात्र अबू सालेमला जास्तीत जास्त २५ वर्षेच शिक्षा देता येत होती. त्यामुळे त्याला तेवढीच म्हणजे २५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.

अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली१९९३च्या बॉम्बस्फोटानंतर तो दुबईत पळून गेला. तिथे त्याने व्यवसाय सुरु केला. त्यानंतर तो पोर्तुगालला पळाला. त्याला सॅटेलाईट फोनच्या जीपीएसमुळे २० सप्टेंबर २००२ मध्ये अटक झाली. तिथे तीन वर्ष त्याच्यावर खटला चालल्यानंतर पोर्तुगाल कोर्टाने त्याच्या भारतातील हस्तांतरणाला परवानगी दिली.

दरम्यानच्या काळात मी सालेम नाहीच असा दावा तो करत होता. मात्र सालेमला भारतात जेव्हा १९९१ मध्ये पहिली अटक झाली होती, तेव्हा घेतलेले हाताचे ठसे आणि फोटोग्राफ हाच पुरावा भारताकडे होता. त्यावरुनच तोच अबू सालेम असल्याचं भारताने पोर्तुगाल सरकारला पटवून दिलं. त्यानंतर नोव्हेंबर २००५ मध्ये त्याला भारतात आणण्यात आलं. अबू सालेमला भारताच्या स्वाधीन करताना, पोर्तुगाल आणि भारत यांच्यात करार झाला होता. त्यावेळी पोर्तुगालने जर अबू सालेम दोषी आढळला, तर त्याला त्यांच्या कायद्यांप्रमाणे शिक्षा द्यावी अशा अटी घातल्या.

पोर्तुगालसोबतच्या या करारामुळे अबू सालेमला जास्तीत जास्त २५ वर्षांचीच शिक्षा देण्यात आली आहे. त्यापैकी १२ वर्षांची शिक्षा त्याने भोगली आहे. त्यामुळे उर्वरित १३ वर्षांचीच शिक्षा त्याला भोगावी लागू शकते. पण भारत सरकारने जर नियमांवर बोट ठेवलं तर त्याला जन्मठेपही होऊ शकते.