ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

अखेर खडसेंविरोधात गुन्हा दाखल

मुंबई, दि. ८ - माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याविरोधात गुरुवारी वाकोला पोलिस ठाण्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवण्यात असून हे प्रकरण पुढील तपासासाठी जळगावमध्ये वर्ग करण्यात आले आहे.

जळगावमधील मुक्ताईनगर येथे खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी कार्यक्रम झाला होता. खडसेंनी त्या कार्यक्रमात तुमच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची माहिती एका महिलेने दमानिया यांना दिली. खडसेंनी लज्जास्पद वक्तव्य केल्याचा दावा करत दमानिया यांनी बुधवारी वाकोला पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.

वाकोला पोलिसांकडे या कार्यक्रमाचा अहवाल नव्हता. तो मिळवून पाहिल्यानंतर पोलिसांनी खडसेंविरोधात कलम ५०९ अन्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान, खडसे यांनी अनेक सभांमध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे दमानिया यांनी सांगितले.