ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

रिपब्लिक टिव्हीने गौरी लंकेशच्या हत्येचे शरम वाटणारे वृत्तांकन केले

मुंबई, दि. ८ एका पत्रकाराने अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टिव्ही बातमीशी ईमान राखत नसल्याचा आरोप करत राजीनामा दिला असून रिपब्लिक टिव्हीने गौरी लंकेश हत्याप्रकरणी चुकीची भूमिका घेतल्याचा दावा करत चॅनेलची पत्रकार सुमन नंदीने राजीनामा दिला फेसबुकच्या माध्यमातून चीड व्यक्त केली आहे.

रिपब्लिक टिव्हीने भाजप प्रणित केंद्र सरकारची बाजू घेत गौरी लंकेश यांच्या हत्येचे ज्या प्रकारे वृत्तांकन केले ते शरम वाटणारे असल्याची चीड त्यांनी व्यक्त केली आहे. गौरी यांची भाजप आरएसएसच्या लोकांकडून धमक्या आल्यानंतर निर्घृण हत्या झाली. तुम्ही अशा खुन्यांना प्रश्न विचारण्याऐवजी विरोधकांवर प्रश्नांचा भडीमार कसा काय करता? तुमची कामाप्रती निष्ठा कुठे गेली? असा सवाल नंदी यांनी रिपब्लिक टिव्हीला विचारला आहे.