ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पुणे, दि. १६ - पुणे महापालिकेचे उपमहापौर नवनाथ कांबळे (वय ४८) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज निधन झाले मॉर्निंग वॉकसाठी निघाले असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले 

नवनाथ कांबळे हे रिपाइंचे ज्येष्ठ कार्यकर्ते असून दलित पँथरमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता. सन १९९७ मध्ये ते प्रथम नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर सन २००२ मध्ये झालेल्या त्रिदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये प्रभाग क्रमांक चौदा या प्रभागातून ते विजयी झाले होते. निवडून आल्यानंतर शहर सुधारणा समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. रिपाइंचे शहराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. 

भाजपने पुण्यात एकहाती सत्ता मिळाल्यानंतर मित्रपक्ष आरपीआयला (आठवले गट) उपमहापौर दिले. आरपीआयकडून उपमहापौर म्हणून नवनाथ कांबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. फेब्रुवारीमध्ये झालेल्या निवडणुकीत कांबळे कोरेगाव मतदार संघातून भाजपच्या चिन्हावर निवडून आले होते. त्यानंतर महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती करण्याचा निर्णय आरपीआयने घेतला होता. शहरातील १६२ जागांपैकी दहा जागांवर आरपीआयला उमेदवारी देण्यात आली होती. दहापैकी पाच जागांवर आरपीआयचे उमेदवार निवडून आले. 

कांबळे यांचा जन्म मार्च १९६९ रोजी झाला होता. त्यांचे शालेय शिक्षण कोरेगाव पार्क येथील संत गाडगे महाराज विद्यालयातून झाले. वाडीया महाविद्यालयातून बी..ची पदवी पूर्ण केली. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत पुण्यात भाजप बरोबर युती केल्यानंतर रिपब्लिकन पक्षातर्फे त्यांना उपमहापौर पदाची संधी मिळाली होती. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते असलेले नवनाथ कांबळे रामदास आठवले यांचे निकटचे स्नेही होते. दोन महिन्पूर्वीच ते उपमहापौर पदावर विराजमान झाले होते.